पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितो ।
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥
कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितो ।
जाणुनियां अवसान नसे हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ।
ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्न शेवटिं जातो ।
या न्यायें बलत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥
गीत : अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत: अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर : ------
नाटक : संगीत शाकुंतल (१८८०)
हे जग म्हणजे रंगभूमी आहे. आपण फक्त त्यावरचे प्रवेश सादर करणारे नट. हे सुखही आपले नाही.हे दु:खही आपले नाही. हे यशही आपले नाही. अपयशही आपले नाही. त्यांनी दिलेले प्रवेश आपण सादर करायचे. आणि तिसरा पडदा पडण्याच्या आधी जसा नाटकातील पात्र रंगमंचावरून बाहेर जाते त्याप्रमाणे या जगाचा निरोप घेयचा. नित्संगपणे.
Saturday, July 9, 2011
Saturday, June 11, 2011
अगा वैकुंठीच्या राया
अगा वैकुंठीच्या राया |
अगा विठ्ठल सखया ||१||
अगा नारायणा |
अगा वासुदेवनंदना ||२||
अगा पुंडलिक वरदा |
अगा विष्णू तू गोविंदा ||३||
अगा रखुमाईच्या कांता |
कान्होपात्रा राखी आता ||४||
[ स्वर - आनंद भाटे / पं. राम मराठे / बालगंधर्व
रचना - संत कान्होपात्रा
राग - भैरवी
ताल - केरवा
नाटक - संत कान्होपात्रा (१९३१) ]

Saturday, May 14, 2011
हे जग म्हणजे रंगभूमी आहे. आपण फक्त त्यावरचे प्रवेश सादर करणारे नट. हे सुखही आपले नाही.हे दु:खही आपले नाही. हे यशही आपले नाही. अपयशही आपले नाही. त्यांनी दिलेले प्रवेश आपण सादर करायचे. आणि तिसरा पडदा पडण्याच्या आधी जसा नाटकातील पात्र रंगमंचावरून बाहेर जाते त्याप्रमाणे या जगाचा निरोप घेयचा. नित्संगपणे.
Subscribe to:
Posts (Atom)